छत्तीसगडमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

धमतारी जिल्ह्यातील खल्लारी आणि मेचका या गावांदरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक झाली. मृत नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. परिसरात अद्याप शोधमोहिम राबविण्यात येत आहे. 

रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील धमतारी जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे जण ठार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
धमतारी जिल्ह्यातील खल्लारी आणि मेचका या गावांदरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक झाली. मृत नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. परिसरात अद्याप शोधमोहिम राबविण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhattisgarh encounter Three women among four Naxals killed in Dhamtari district