कालीचरण महाराजला झटका! कोर्टानं फेटाळला जामीन अर्ज

गांधीजींबद्दल केलं होतं आक्षेपार्ह विधान
Kalicharan Maharaj Arrest
Kalicharan Maharaj Arrestgoogle

रायपूर : गांधीजींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आणि नथुराम गोडसेचं (Nathuram Godse) कौतुक करणाऱ्या कथीत अध्यात्मिक गुरु कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) याला कोर्टानं झटका दिला आहे. रायपूर सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज नाकारला आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो येथून त्याला छत्तीसगड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. (Chhattisgarh Raipur court rejected the bail plea of Kalicharan Maharaj)

गांधीजींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आणि नथुराम गोडसेचं कौतुक करणाऱ्या कथीत अध्यात्मिक गुरु कालिचरण महाराज याला कोर्टानं झटका दिला आहे. रायपूर सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज नाकारला आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो येथून त्याला छत्तीसगड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तसेच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

Kalicharan Maharaj Arrest
कालीचरणला 13 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी

धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातून कालीचरण महाराजावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्याअनुषंगानं देशात विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ३० डिसेंबर २०२१ रोजी छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रायपूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चेतना ठाकूर यांच्या न्यायालयाने कालीचरणला १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

कालीचरण महाराजांना सोडा! ट्विटरवर ट्रेंड

अटकेच्या कारवाईनंतर कालीचरणच्या समर्थकांकडून त्यांना सोडवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, ट्विटरवर ट्रेन्डही तयार झाला होता.

कालीचरण महाराजने काय केलं होतं वक्तव्य

कालीचरणने काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला नमस्कार करतो, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला गेला होता.

कोरोनाबद्दल काय केलं होतं विधान?

कोरोना ही भयानक महामारी नाही. ज्या कोरोनामुळं लोकांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टरांनी मारलं आहे. यासाठी किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे, असा धक्कादायक आरोपही कालीचरणने केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com