Unknown Disease : छत्तीसगडमध्ये अज्ञात आजाराचे थैमान; दोन वर्षांत ६१ ग्रामस्थांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unknown Disease in Chhattisgarh

Unknown Disease : छत्तीसगडमध्ये अज्ञात आजाराचे थैमान; दोन वर्षांत ६१ ग्रामस्थांचा मृत्यू

Unknown Disease in Chhattisgarh सुकमा : छत्तीसगड (Chhattisgarh) जिल्ह्यातील कोन्टा ब्लॉकमधील रेगडगट्टा गावात अज्ञात आजाराने (Unknown Disease) कहर केला आहे. या आजाराने दोन वर्षांत ६१ जणांचा मृत्यू (Died) झाला आहे. आजही गावातील ४० हून अधिक ग्रामस्थ आजाराच्या विळख्यात आहेत. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले हे जाणून घेण्यासाठी आता अधिकारी कृतीत उतरले आहेत.

या अज्ञात आजाराने ग्रस्त असलेले काही ग्रामस्थांवर सुकमा शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. अद्यापपर्यंत आरोग्य विभागाचे पथक अज्ञात आजाराबाबत गंभीर होताना दिसत नाही. त्यामुळे या आजाराबाबत (Unknown Disease) अद्याप कोणतीही माहिती आरोग्य विभागाला मिळू शकलेली नाही. आरोग्य विभागाच्या पथकाने गावकऱ्यांचे नमुने निश्चित घेतले असले तरी चाचणीचे अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना जिवाची चिंता सतावू लागली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराचे कारण केले स्पष्ट; म्हणाले...

रेगडगट्टा गावाच्या आसपासच्या लोकांनाही या गूढ आजाराची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची भीती वाटू लागली आहे. रेग्गडी पट्टी गावातील बडा पारा, पटेल पारा आणि ताडगोरा पारा या भागातील लोकांना या अज्ञात आजाराचा सर्वाधिक फटका बसला आहे. हातपाय सुजल्यानंतर पोट फुगण्याची तक्रार असते. वेदना शरीरात वाढतात आणि काही दिवसांतच रुग्णाचा मृत्यू होतो. २०२० मध्ये पहिला मृत्यू (Died) माडवी मंगडू याचा झाला होता. तेव्हापासून आजतागायत मृत्यूची प्रक्रिया सुरू आहे, असे ग्रामस्थ पांडूराम मुचकी यांनी सांगितले.

कोन्टा विकास गटात असलेल्या रेगडगट्टा गावातील रहिवाशांनी अलीकडेच हा मुद्दा जिल्हा अधिकाऱ्यांसमोर मांडला होता. त्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की आजार आणि नैसर्गिक कारणांसह विविध कारणांमुळे ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाणी आणि मातीमध्ये आर्सेनिक सारख्या जड धातूंचे प्रमाण ओळखण्यासाठी सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे.

८ ऑगस्टला पथक जाणार

८ ऑगस्ट रोजी पर्यावरणीय कारणांचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ञांचे पथक गावात पाठवले जाईल. गावाची लोकसंख्या एक हजार पेक्षा जास्त आहेत. तेथे १३० कुटुंबे राहतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २७ जुलै रोजी गावकऱ्यांनी सुकमा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सुपूर्द केले होते. पत्रात दावा केला आहे की, २०२० पासून हात आणि पायांवर सूज येण्याची लक्षणे असलेल्या तरुण आणि महिलांसह ६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू टाळण्यासाठी तातडीने डॉक्टरांचे पथक पाठवावे, अशी विनंती ग्रामस्थांनी प्रशासनाला केली आहे.

हेही वाचा: Airbag Policy : एअर बॅगची किंमत किती? कार मालकांना नितीन गडकरींचे उत्तर

सर्व अज्ञात आजाराने मेले नाही

स्थानिकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मागच्या आठवड्यात आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची आणि इतर तज्ञांची टीम तेथे पाठवण्यात आली होती, असे सुकमाचे जिल्हाधिकारी हरीश एस यांनी पीटीआयला सांगितले. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, तीन वर्षांत गावात ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, ते सर्व अज्ञात आजाराने मरण पावले नाही, असे हरीश एस म्हणाले.

हेवी मेटल सामग्रीमुळे मृत्यू झाल्याचे म्हणता येणार नाही

मृतांपैकी काहींच्या अंगावर सूज होती. ही सूज ती वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. जलस्रोतांच्या नमुन्यांच्या प्राथमिक अहवालात दोन जलस्रोतांमध्ये फ्लोराईडची पातळी मर्यादेपेक्षा जास्त होती. तर काही स्रोतांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. आम्ही असे म्हणू शकत नाही की पाण्यातील हेवी मेटल सामग्रीमुळे मृत्यू झाला आहे. कारण, जास्त फ्लोराईड वाहून नेणाऱ्या पाण्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि स्थानिक लोकांमध्ये अशी कोणतीही लक्षणे नाही, असेही हरीश एस म्हणाले.

इतर पर्यावरणीय कारणेही जबाबदार

लोहाचे प्रमाण जास्त झाल्यास गुंतागुंत निर्माण होते. परंतु, अचानक मृत्यू होऊ शकत नाही. इतर पर्यावरणीय कारणेही असू शकतात. पाण्यामध्ये आणि मातीमध्ये आर्सेनिकसारख्या जड धातूंचे प्रमाण ओळखण्यासाठी सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे, असेही हरीश एस म्हणाले.

हेही वाचा: Accident In River Ganga : बोटीत सिलिंडरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू

पथकाने गावकऱ्यांची तपासणी केली होती

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गावाला भेट देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने गावकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली होती. ज्यामध्ये ४१ जणांना शरीरात सूज आणि किडणीशी संबंधित समस्या असल्याचे आढळून आले. तपासणीत यूरिक ॲसिड आणि क्रिएटिनिनची पातळी सामान्य पॅरामीटर्सच्या तुलनेत वाढलेली दिसली. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी दोन अत्यंत अशक्त रुग्णांना सुकमा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावर्षी गावात १५ मृत्यू

प्राथमिक तपासणीत यावर्षी गावात १५ मृत्यू अनेक कारणांमुळे झाले आहेत. ज्यात मूत्रपिंडाचे आजार, वृद्धापकाळाशी संबंधित समस्या आणि मलेरियाचा समावेश आहे. यापैकी किती जणांचा मृत्यू मूत्रपिंडाच्या आजारांमुळे झाला याची पुष्टी करता आली नाही, असे जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) यशवंत ध्रुव यांनी सांगितले.

मूत्रपिंडाच्या आजाराची सौम्य लक्षणे

२० जलस्रोतांची तपासणी केली असता दोन हातपंपांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. त्यानंतर हे पाणी वापरण्यासाठी बंद करण्यात आले. ग्रामस्थांनी आठ जलस्रोत पिण्यासाठी वापरू नये, असे सांगितले आहे. कारण, त्यात लोहाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आहे. काही गावकऱ्यांमध्ये तीव्र मूत्रपिंडाच्या आजाराची सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्या पुढील चाचण्या सुरू आहे, असे यशवंत ध्रुव यांनी सांगितले.

Web Title: Chhattisgarh Unknown Disease 61 Villagers Died

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..