अंतराळात मिळणार चिकन बिर्याणी, शाही पनीर

वृत्तसंस्था
Thursday, 11 February 2021

अंतराळवीरांना अवकाशातही चपातीसह चिकन बिर्याणी, चिकन कुर्मा, शाही पनीर, डाल-चावल, आलू पराठा, डाल मखनी, खिचडीचा आस्वाद घेता येणार आहे. शिवाय कैरीच्या लोणच्यामुळे त्यांच्या जेवणाची लज्जत वाढणार आहे.

नवी दिल्ली - भारताची पहिली महत्त्वाकांक्षी मानवी अवकाश मोहीम गगनयानचे उड्डाण पुढील वर्षी होणार आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांसाठी लष्कराच्या प्रयोगशाळेत खास प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ विकसित केले आहेत. यामुळे अंतराळवीरांना अवकाशातही चपातीसह चिकन बिर्याणी, चिकन कुर्मा, शाही पनीर, डाल-चावल, आलू पराठा, डाल मखनी, खिचडीचा आस्वाद घेता येणार आहे. शिवाय कैरीच्या लोणच्यामुळे त्यांच्या जेवणाची लज्जत वाढणार आहे.

या मोहिमेसाठी निवड झालेले हवाई दलाचे वैमानिक रशियात प्रशिक्षण घेत आहेत. अवकाशात त्यांचा आहार कसा असावा, याविषयी लष्करी प्रयोगशाळेत गेल्या दोन व र्षांपासून अनेक अन्न घटकांवर संशोधन सुरू असून त्यातून वैविध्यपूर्ण ‘मेन्यू’ तयार झाला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आहाराची वैशिष्ट्ये
  लष्कराच्या प्रयोगशाळेने इस्रोच्या मदतीने ‘मेन्यू’ तयार केला
  १०० आणि २०० ग्रॅम वजनाची पाकिटे तयार करणार
  अंतराळवीरांना आवडीनुसार पदार्थ नेता येणार  
  वजनाला हलके, कमी आकारमानातील आणि खाण्यास सोप्या पदार्थांची संतुलित आहार देण्यावर भर
  अन्न पदार्थांच्या पाकिटांत पाणी आणि चहा-कॉफी पिण्यासाठी विशेष स्ट्रॉ, अन्न गरम करण्याचे साहित्य आणि कचरा प्रतिबंधक पिशव्या. 
अमेरिका आणि  रशियाचे अंतराळवीर त्यांच्या आवडीचे पदार्थ अंतराळात नेतात. आपल्या भारतीयांना घराच्‍या अन्नाची व चवीची सवय असते. त्यामुळे तसे अन्न अंतराळवीरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- शास्त्रज्ञ, संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा, म्हैसूर

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken biryani and shahi paneer will be available in the space