esakal | माजी आमदाराच्या मुलानं केली कोंबडीचा खुन झाल्याची तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

chicken prices

कोंबडीचा झाला खून; माजी आमदाराच्या मुलाची पोलिसात तक्रार

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमधील एका माजी आमदाराच्या मुलानं कोंबडीच्या मृत्यूनंतर खुनाची तक्रार दाखल केली आहे. उत्तरप्रदेशमधील महाराजागंज जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत विषबाधा झाल्याने कोंबडीचा मृत्यू झाल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराजागंज परिसरात या घटनेची मोठी चर्चा होतेय.

उत्तर प्रदेशच्या महाराजागंज जिल्ह्याचे माजी आमदार दुखी प्रसाद यांचा मुलगा राजकुमार भारती यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पिपारा कल्याण गावात राहणाऱ्या भारती यांनी तक्रार करताना, कामानिमीत्त मी बाहेर गेलो असता, घरी आल्यानंतर कोंबडीचा मृत्यू झाल्याचे समजले असे सांगितले आहे. आपल्या कोंबडीला विष देऊन मारण्यात आलं असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

हेही वाचा: पतीचे वर्क फ्रॉम ऑफिस सुरू करा; पत्नीचे पत्र व्हायरल

आम्ही प्राण्यांवर खुप प्रेम करतो, आमच्याकडे कबूतर, पोपट, कोंबडी आणि बरेच पक्षी आहेत. आमच्या कोंबडीला कोणीतरी जाणीपुर्वक मारलं असा आरोप देखील भारती यांनी सांगितले आहे. तसेच या कोंबडीचे शवविच्छेदन करण्याची सुद्धा मागणी केली आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार सुंदरिया पोलिस स्टेशनचे अधिकारी रितुराज सुमान यांनी ही माहिती दिली असून ते या प्रकरणाचती चौकशी देखील करणार आहे.

loading image
go to top