काँग्रेस नेते चिदंबरम यांच्याकडून मोदी सरकारची स्तुती

वृत्तसंस्था
रविवार, 3 मार्च 2019

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी भाजप सरकारची स्तुती केली आहे. पी. चिदंबरम यांनी गंगा स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अभियानावरुन भाजप सरकारचे कौतुक केले आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी भाजप सरकारची स्तुती केली आहे. पी. चिदंबरम यांनी गंगा स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अभियानावरुन भाजप सरकारचे कौतुक केले आहे.

तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि यूपीएच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली आधार योजनादेखील पुढे वाढवल्याबाबत त्यांनी भाजप सरकारची प्रशंसा केली आहे. चिदंबरम यांनी शनिवारी (3 मार्च) आपले पुस्तक 'अनडॉन्टेड : सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया'चे (Undaunted: Saving the Idea of India) प्रकाशन केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या काही कामांची जाहीर स्तुती केली तर काही गोष्टींबाबत नाराजीही व्यक्त केली. 

चिदंबरम पुढे म्हणाले की, आधीच्या सरकारच्या तुलनेत मोदी सरकारने एका दिवसात जास्त राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केली आहे. मोदी सरकारने राबवलेला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा कार्यक्रम यशस्वी झाला, असे मला वाटते. पुढील सरकार याहून अधिक राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: chidambaram appriciate modi government for many scheme