जेटलींच्या वक्तव्यांवर चिदंबरम यांची टीका

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांत संघर्ष सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. जेटली हे 1975 रोजी दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करताना बंडखोरांची आघाडी केली होती का, असा सवाल केला आहे. जेटली यांनी शनिवारी एका कार्यक्रमात विद्यापीठातील संघर्षाला बंडखोरांची आघाडी कारणीभूत असल्याचे म्हटले होते. फुटीरवादी आणि कट्टरपंथीय एकच भाषा बोलत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले होते.

या मताचा आधार घेत ट्विटरवर मत व्यक्त करताना चिदंबरम म्हणाले, की 1975 मध्ये दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहिलेले जेटली हे बंडखोरांचे नेतृत्व करत होते काय? लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्‍समध्ये व्याख्यान देताना जेटली यांनी म्हटले, की वेगळी भूमिका आणि मत मांडणाऱ्यांनादेखील बोलू द्यायला हवे. समाजात भाषास्वातंत्र्यावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे आपले वैयक्तिक मत असून, त्यात हिंसेला अजिबात थारा असू नये. दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये डाव्या विचाराची "आयसा' आणि "अभाविप' यांच्यात झालेल्या संघर्षानंतर जेटली यांनी वक्तव्य केले होते.

Web Title: Chidambaram remarks on criticism of jetali