Atal Bihari Vajpayee: वाजपेयी अत्यवस्थ; मुख्यमंत्री फडणवीसही दिल्लीला रवाना

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयात गर्दी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आज (ता.16) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दिल्लीकडे रवाना होणार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते दिल्लीला जाणार आहेत.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयात गर्दी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आज (ता.16) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दिल्लीकडे रवाना होणार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते दिल्लीला जाणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, त्यांची कन्या प्रतिभा यांच्यासह मंत्री पियुष गोयल, स्मृती इराणी, सुरेश प्रभू, सुषमा स्वराज आदींनी एम्सला भेट देऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त देशभर पोचताच त्यांच्या चाहत्यांनी नवी दिल्लीकडे धाव घेतली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी देशभर जपतप सुरू आहेत. एम्सबरोबरच राजधानी दिल्लीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

तसेच, अटलजी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला यांच्यासह विविध पक्षाचे नेते दिल्लीत एम्समध्ये दाखल झाले आहेत.

Web Title: Chief Minister Fadnavis also left for Delhi