चाईल्ड पॉर्न प्रकरणात फेसबुक, व्हॉट्सअॅपला लाखाचा दंड 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

ज्या सोशल नेटवर्किंग साईट्सनी चाईल्ड पॉर्न आणि बलात्काराच्या व्हिडीओविरोधात पावले उचलली नाहीत त्यांना सुप्रीम कोर्टाने चांगलाच झटका दिला. या प्रकरणात कोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअॅप, गुलल इंडिया, याहू, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

नवी दिल्ली : ज्या सोशल नेटवर्किंग साईट्सनी चाईल्ड पॉर्न आणि बलात्काराच्या व्हिडीओविरोधात पावले उचलली नाहीत त्यांना सुप्रीम कोर्टाने चांगलाच झटका दिला. या प्रकरणात कोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअॅप, गुलल इंडिया, याहू, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बी. लोकूर आणि उमेश ललित यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. बलात्कार आणि चाईल्ड पॉर्न सारख्या आक्षेपार्ह व्हिडीओविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होता. याची दखल घेऊन 16 मे रोजी कोर्टाने निकाल दिला. कोर्टाने या सोशल नेटवर्किंग साईट्सना आक्षेपार्ह व्हिडीओ हटविण्याचे आदेश देऊनही त्याच्यावर काही उपाययोजना केल्या जात नव्हत्या. त्यामुळेच त्यांना 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. 15 जूनपर्यंत आपले म्हणणे मांडत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. 

Web Title: child porn on social networking sites