मुलाला खेळायला दिला फोन अन् सापडले वडिलांचे...

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

बंगळूरमध्ये स्थायिक असलेल्या नागाराजूचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. आपला चौदा वर्षाचा मुलगा मोबाईल गेम खेळण्यात गुंतून जाईल असे त्यांना वाटले होते. मात्र, त्या मुलाने वडिलांचे विवाहबाह्य संबंध शोधून काढले.

बंगळूर : घरातील लहान मुले अनेक गोष्टींसाठी हट्ट धरतात, तो हट्ट घरातील वरिष्ठांनी पूर्ण करावा म्हणून रडतात. त्यांचे हे हट्ट पूर्ण करण्यासाठी प्रसंगी मुलांचे आई-वडील त्यांचे सर्व हट्ट पुरवतात. अलीकडील काळात मुलांना शांत करण्यासाठी पालक आपला मोबाईल देऊन मोबाईलमधील गेम खेळण्यात गुंतवतात. मुलांनी गोंधळ करू नये, घरात शांती राहावी असा त्यांचा उद्देश असतो. मात्र, वडिलांनी खेळण्यासाठी दिलेल्या मोबाईलमधील काही गोष्टी उलगडत एका मुलाने घरातील शांतता भंग केली. असाच काहीसा प्रकार बंगळूरमध्ये घडला आहे. मुलांना मोबाईल खेळण्यासाठी देणे बंगळूरमधील एका व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले आहे.  

बंगळूरमध्ये स्थायिक असलेल्या नागाराजूचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. आपला चौदा वर्षाचा मुलगा मोबाईल गेम खेळण्यात गुंतून जाईल असे त्यांना वाटले होते. मात्र, त्या मुलाने वडिलांचे विवाहबाह्य संबंध शोधून काढले. मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंग मुलाच्या हाती लागल्यावर त्या मुलाने ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली. त्यामुळे नागाराजूला हे प्रकरण चांगले महागात पडले असून त्याचा 15 वर्षांचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.  

बंगळूरातील बाणाशंकरी नागाराजू आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. त्याची पत्नी शाळेत शिक्षिका आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर नागाराजूच्या पत्नीने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. नवऱ्याने मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.

गेल्या आठवड्यात 11 जुलैला नागाराजूने त्याचा मोबाईल मुलाला खेळण्यासाठी दिल्यानंतर मुलाने फोन रेकॉर्डर आणि व्हॉट्सअॅप चॅट ओपन केले होते. त्यावेळी त्याला वडिलांचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचे कळले. वडील आणि संबंधित महिलेमध्ये झालेले अश्लिल संवादाचे मेसेजेस त्याने पाहिले. त्याने लगेच आईला ते सर्व मेसेज दाखवले. जेव्हा पत्नीने नागाराजूला याबद्दल जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. याबद्दल कुटुंबीयांकडे वाच्यता केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी नागाराजूने धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The child was found the fathers extramarital affair when he given a phone to play