गुगलने डूडलद्वारे दिल्या बालदिनाच्या शुभेच्छा

childrens day wishes to kids with doodle by google
childrens day wishes to kids with doodle by google

आज देशभरात मोठ्या उत्साहात बालदिन साजरा होत आहे. जाहीर कार्यक्रमात कित्येकदा लहान मुलांच्या गराड्यात दिसलेले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी बालदिन भारतात साजरा केला जातो. यानिमित्ताने गुगल इंडियानेही आकर्षक डूडल बनवत बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

बालदिन विशेष या गुगल डूडल मध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. आकाशगंगा, ग्रह-तारे, सप्तर्षी यांचं दूर्बिणीतून निरिक्षण करणारी लहान मुलगी दिसत आहे. अवकाशात झेप घेण्यासाठी एक यानही डूडलमध्ये दाखविले आहे. 

लहान मुलांमधील जिज्ञासू वृत्ती आणि भटकंती या गुणांना अधिक वाव मिळावा याचेच हे गुगल डूडल प्रतिक आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली झाला. तर 1964 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. बालदिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. जगात विविध देशांमध्ये तो विविध दिवशी साजरा केला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com