'लव्ह जिहाद'वरुन हत्या, व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

उदयपूर (राजस्थान)- येथे बुधवारी एका व्यक्तिने एका तरुणाची हत्या करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये लव्ह जिहाद संपविले नाही तर प्रत्येक भारतीयाला अशा भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी धमकी देत एक व्यक्ति एका तरुणाची हत्या करताना दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करणाऱ्या व्यक्तिचे नाव शंभू लाल असे आहे. राजस्थानमधील राजसमंदमध्ये ही घटना असून, घटनास्थळावरून ताब्यात घेतलेला मृतदेह हा व्हिडिओमधील व्यक्तीचाच असल्याचे बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी सांगितले. 

आफ्राझूल अशी हत्या झालेल्या तरूणाची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गुरूवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. परंतु, व्हिडिओ समोर येइपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, व्हिडिओमधील आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून केला जाणार असल्याचे राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी म्हंटले आहे. 

Web Title: Chilling Murder In Rajasthan On Video