esakal | चीनने केला विश्वासघात? लडाखमधून सैन्य मागे घेण्यास ड्रॅगन नाखूश
sakal

बोलून बातमी शोधा

Indian_Army_Ladakh.jpg

चीनने भारतासोबत विश्वासघात केल्याचं दिसत आहे. कारण पूर्व लडाखच्या भागातून चीनने आपले सैन्य मागे घेतलेले नाही.

चीनने केला विश्वासघात? लडाखमधून सैन्य मागे घेण्यास ड्रॅगन नाखूश

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- चीनने भारतासोबत विश्वासघात केल्याचं दिसत आहे. कारण पूर्व लडाखच्या भागातून चीनने आपले सैन्य मागे घेतलेले नाही. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. १५ जूनच्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावरच्या अनेक बैठका पार पडल्या. त्यानंतर चीनने आपले सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते. मात्र, चीन लडाखच्या काही भागातून सैन्य मागे घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.

चीन-अमेरिका वाद शिगेला; ७२ तासात दुतावास बंद करण्याचे आदेश
चीनचे सैन्य डेप्सांग प्लेन, गोगरा पोस्ट, फिंगर रिजन आणि पैंगोंग तलाव येथे अजूनही तळ ठोकून आहे. भारत आणि चीनने या भागातून सैन्य मागे घेण्याचे ठरवले होते. यासाठी  प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बफर झोन तयार करण्यात आला होता. यानुसार दोन्ही सैन्याने आपल्या सद्य स्थितीतून माघार घेण्याचे मान्य केले होते.

गलवान खोरे, हॉट स्प्रिंग या भागातून चिनी सैन्य मागे हटले आहे. शिवाय फिंगर रिजन आणि पैंगोंग तलावाच्या काही भागातून चिनी सैन्य मागे गेले आहे. मात्र, गोगरा पोस्ट आणि डेस्पांग प्लेन येथून चिनी सैन्याची मागे हटण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच फिंगर एरिया ५ ते फिंगर एरिया ८ पर्यंत चिनी सैन्य जागच्या जागी आहे. येथील भाग चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने बेकायदेशीररित्या बळकावला आहे. फिंगर एरिया ५ मधून चिनी सैन्य मागे हटण्यास नाखूश असल्याचं कळत आहे. चीनने हॉट स्प्रिंग आणि गोगरा पोस्टमध्ये बांधकाम सुरु केले आहे. 

चीन मागे हटण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. चीनने या भागात मोठ्या प्रमाणात सैनिकांची जुळवाजुळव केली आहे. जवळजवळ ४० हजार सैनिक या भागात तैनात आहेत. शस्त्रास्त्र, हवाई संरक्षण प्रणाली, शस्त्र सज्ज वाहने आणि रणगाडे या भागात मोठ्या प्रमाणात आणण्यात आले आहेत. एएनआय या वृत्त संस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

चीनने सर्वात आधी लसीचा विकास केल्यास अमेरिका मदत घेणार का? ट्रम्प म्हणतात
उभय देशामध्ये १४-१५ जूलैला शेवटची लष्करी स्तरावर बोलणी झाली होती. दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यास होकार दर्शवला होता. मात्र, त्यानंतर सीमा भागात कोणतीही प्रगती झालेली दिसत नाही. चीनला आपल्या वचनाचा विसर पडल्याचं दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा चर्चा झाली. राजकीय आणि लष्करी पातळीवर भारताने चीनशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. तणाव निवळण्याठी दोन्ही देशांनी सैन्य मागे घ्यावे, यावर दोघांचे एकमत झाले होते. मात्र, त्याचा काही फायदा झाला नसल्याचं दिसत आहे.

loading image