अरुणाचलमधील सहा परिसरांचे चीनकडून नामकरण

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

अरुणाचल प्रदेशमधील काही भागांवर हक्क दाखविण्याचा प्रयत्न चीनने पुन्हा एकदा भारताची खोडी काढली आहे. अरुणाचल प्रदेशमधील सहा परिसरांना चीनने अधिकृते नावे दिल्याचे जाहीर केले आहे.

बीजिंग - अरुणाचल प्रदेशमधील काही भागांवर हक्क दाखविण्याचा प्रयत्न चीनने पुन्हा एकदा भारताची खोडी काढली आहे. अरुणाचल प्रदेशमधील सहा परिसरांना चीनने अधिकृते नावे दिल्याचे जाहीर केले आहे.

तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या भेटीमुळे भारत-चीन संबंध आणि सीमाप्रश्‍नावर नकारात्मक परिणाम झाल्याचे चीनने म्हटले आहे. आता पुन्हा अरुणाचल प्रदेशमधील सहा परिसरांचे चीनने नामकरण केल्याचे जाहीर करत हक्क दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. "भारत ज्या भागाला "अरुणाचल प्रदेश' असे संबोधतो त्या "दक्षिण तिबेट' येथील सहा परिसरांना चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रोमन भाषेतील नावे दिली आहेत', असे वृत्त चीनमधील वृत्तपत्राने दिले आहे. वोग्यानग्लिंग, मिला री, क्वीडेंगार्बो री, मेन्क्‍युका, बुमो ला आणि नामकापुब री अशी सहा नवीन नावे चीनने दिली आहेत. भारत-चीनदरम्यानच्या 3 हजार 488 किलोमीटरवरील प्रत्यक्ष सीमारेषेवरून दोन्ही देशात वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशला चीनकडून दक्षिण तिबेट संबोधले जाते.

Web Title: China announces 'standardised' names for 6 places in Arunachal