चीनकडून युद्धसराव; भारताकडे तयार आहे 'हा' प्लॅन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नवी दिल्ली- भारत-चीनमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेवर तिबेटच्या स्वायत्त प्रदेशात चिनी हवाई दलाकडून युद्धसराव चालू आहे. या भागात उभारलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे चीनची हवाई ताकदही वाढली आहे. चीनची ही आक्रमकता लक्षात घेऊन त्यांना रोखण्यासाठी भारतीय हवाई दलानेही प्लान तयार केला आहे. भारतीय हवाई दलाकडून चीनूक आणि अपाची या हेलिकॉप्टर्सचे स्कवाड्रन तैनात करण्याची योजना आहे.

रशियाच्या एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीशिवाय राफेल फायटर विमानांचे एक स्कवाड्रनही येथे सज्ज ठेवण्यात येईल. एकूणच चीनला जशास तसे उत्तर देण्याची भारतीय हवाई दलाने तयारी केली आहे. सीमेपलीकडे चीनची वाढलेली सक्रीयता लक्षात घेऊन या भागात सुखोईचे एसयू-30 एमकेआयचे आणखी एका स्कवाड्रन तैनात करण्यावरही विचार सुरु आहे. 
चीनूक आणि अपाची हेलिकॉप्टर्सचा 2020 पर्यंत भारतीय सैन्य दलांमध्ये समावेश होणार असून एस-400 आणि राफेल फायटर विमाने 2021 पर्यंत ताफ्यात दाखल होतील. डोकलाम संघर्षानंतर चीनने तिबेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीवर विशेष लक्ष दिले आहे. ऑगस्ट 20014 पासून आकाश क्षेपणास्त्राची सहा युनिट इथे सज्ज ठेवण्यात आली आहेत असे हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: China builds air assets in Tibet, Indian missile units head east