चीनची एकीकडे शांततेची चर्चा तर दुसरीकडे युद्धाची तयारी?

वृत्तसंस्था
Friday, 11 September 2020

पॅंगॉंगमधील चिनी सैन्याच्या माघारानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्ष चिनी सैन्यावर नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यास प्रतिसाद म्हणून आता चीन भारतावर दबाव आणू पाहत आहे.

नवी दिल्ली: India-China Standoff: एकीकडे चीन भारताशी शांततेच्या वाटाघाटी करण्याच्या प्रयत्न करत असताना दिसतंय. तर दुसरीकडे एलएसीवर (Line of Actual Control) चीन आपले सैन्य आणि आधुनिक शस्त्रे गोळा करण्याचा प्रयत्न करून युध्दसज्ज होत असल्याचेही दिसत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार चीनने एलएसीवर युद्धाची तयारी सुरू केली असून देशभरातून जवळपास  50 हजार सैनिक तैनात केले आहेत.  याशिवाय चीनचे एच -6 बॉम्बर भारत-चीन सीमेवरही नजर ठेवून आहेत. एका अहवालानुसार, पॅगॉंगमधील वादानंतर चीनने या भागात 50 हजार सैनिक तैनात केले आहेत.  याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात विमान आणि क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आली आहेत.  चिनी सैन्यांनी काही दिवसांपुर्वीच भारतीय सैन्यांना चिथावणी देण्यासाठी गोळीबार केला होता. मागील 45 वर्षानंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमारेषेवर गोळीबार झाला होता.

 चीनने लडाखमधील एलएसीवर जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट फोर्स आणि 150 लढाऊ विमानही तैनात केले आहेत. पॅंगॉंगमधील चिनी सैन्याच्या माघारानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्ष चिनी सैन्यावर नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यास प्रतिसाद म्हणून आता चीन भारतावर दबाव आणू पाहत आहे. बीजिंगच्या आदेशानुसार दररोज पॅंगॉंग तलावाच्या दक्षिणेकडील चिनी सैनिक भारतीय परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. सध्या पीएलए (People's Liberation Army) सीमेच्या बाजूने हलकी टँक पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे, जी भारतीय सैन्याने काही दिवसांपुर्वी अडवली होती. तरीसुध्दा चीन या भागात मोठ्या प्रमाणता सैन्य आणि शस्त्रे तैनात करत असल्याचेही दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार लडाखमध्ये देशाच्या विविध भागातून सैन्य आणलं जात आहे. याभागात हवाई संरक्षण, सशस्त्र वाहने, पॅराट्रूपर्स, विशेष सैन्य आणि पायदळ सैन्य देशाच्या भागातून मागवून या भागात तैनात केले गेले आहेत. याअगोदर सीमारेषेवर असलेल्या सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणार नाही. द्विपक्षीय कराराचे पालन व्हायला हवे. मतभेदाचे रुपांतर वादात व्हायला नको, अशी चर्चाही दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झाली होती. पण याचा काहीही उपयोग होत नसताना दिसत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सीमारेषेवर मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेल्या चिनी सैन्याबाबत भारताकडून प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले. सैन्याशिवाय युद्धजन्य परिस्थिती दर्शवण्यासाठी काही उपकरणेही चिनी सैन्याने सीमारेषेवर आणल्याच्या बातम्या आल्या होत्या, आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China deploys 50000 troops and H-6 bombers on LAC