esakal | घरी सुरू होती लग्नाची तयारी, मुलगा देशासाठी झाला हुतात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh orang

भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात एकूण २० भारतीय जवान हुतात्मा झाले 

घरी सुरू होती लग्नाची तयारी, मुलगा देशासाठी झाला हुतात्मा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुरी (पश्‍चिम बंगाल) : भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात एकूण २० भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानात पश्‍चिम बंगालच्या राजेश ओरांग यांचाही समावेश आहे. राजेश २०१५ मध्ये लष्करात दाखल झाले होते आणि तीन भावंडात ते सर्वात मोठे होते. राजेश यांचे कुटुंब पुढील सुट्टीत त्यांचा विवाह करण्याच्या तयारीत होते. यादरम्यान ते हुतात्मा झाल्याची वार्ता येऊन धडकली.

हुतात्मा कुंदन 17 दिवसांपूर्वीच पिता झाले होते, अजून मुलीचा चेहराही पाहिला नव्हता

राजेश यांचे वडील सुभाष म्हणाले की, माझ्या मुलाने देशसेवेसाठी प्राणाची आहुती दिली. राजेश यांची आई ममता या अजून बोलण्याच्या स्थितीत नाहीत. पुढील सुट्टीत जेव्हा मुलगा घरी येईल, तेव्हा त्याचा विवाह करू, असा विचार त्याच्या पालकांनी केला होता. सुभाष म्हणाले की, राजेशला दोन लहान बहिणी आहेत. तो २०१५ मध्ये लष्करात बिहार रेजिमेंटकडून दाखल झाला होता. लष्करी अधिकाऱ्यांनी काल सायंकाळी वडील सुभाष यांना फोन करून राजेश हुतात्मा झाल्याची माहिती दिली. 

मोठी बातमी : चीन सीमेवर 20 भारतीय जवान हुतात्मा; चीनचे 43 मारले!

लहान बहीण शकुंतला म्हणाली की लहानपणापासून माझ्या भावाला देशाची सेवा करायची होती आणि तो लष्करात गेल्याने आनंदी होता. काही महिन्यांपूर्वीच तो सुटी घालवण्यासाठी घरी आला होता. घरात त्याच्या लग्नाची घाई सुरू होती. विरभूम जिल्ह्यातील मोहंमदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेलगोरिया गावात शेती करणारे सुभाष यांनी गरिबीत कुटुंबाचा सांभाळ केला. 

लष्करी वारसा चालवणारा अंकुश ठाकूर 

हिमाचल प्रदेशच्या करोहाटा गावातील जवान अंकुश ठाकूर हुतात्मा झाला. या संघर्षात एकूण २० भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. अंकुश यांच्या निधनाची वार्ता कळताच गावावर शोककळा पसरली. भोरज उपविभागात असलेल्या करोहटा गावचा रहिवासी अंकुश हा २०१८ मध्ये पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाला होता. त्याचे वडील आणि आजोबादेखील लष्करात होते. त्याचा लहान भाऊ सहावीत आहे. 

लडाख सीमारेषेवर तणाव: पाक चीनच्या तर अमेरिका भारताच्या बाजूनं

अंकुश हुतात्मा झाल्याची वार्ता लष्कराच्या मुख्यालयातून करोहटा ग्राम पंचायतीला फोनवरून देण्यात आली. गावचा मुलगा हुतात्मा झाल्याचे कळताच नागरिकांनी चीनविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान, ठाकूर यांच्या निवासस्थानी गावकऱ्यांनी गर्दी केली. ग्रामपंचायतचे वॉर्ड पंच विनोद कुमार यांना लष्कराच्या मुख्यालयातून फोन आला आणि अंकुश हुतात्मा झाल्याचे सांगण्यात आले.