चीनच भारताचा सर्वांत मोठा भागीदार

Business
Business

नवी दिल्ली - गेल्या वर्षभरात चीनबरोबर सीमावाद निर्माण होऊनही आणि ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल सुरु करूनही चीन हाच भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश ठरला आहे. वर्ष २०२० मध्ये दोन्ही देशांमध्ये ७७.७ अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे. चीनने अमेरिकेला मागे टाकत भारताबरोबरील व्यापारात पहिले स्थान मिळविले आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत आणि चीनमधील व्यापाराचे यंदाचे प्रमाण गेल्या चार वर्षांच्या तुलनेत कमी आहे. तरीही कोरोनामुळे अमेरिकेबरोबरील व्यापारात मर्यादा आल्याने चीनने भारताबरोबरील व्यापारात बाजी मारली आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने सुरु केलेले प्रयत्न अद्यापही पुरेसे नसल्याचे यावरून दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०१९ या वर्षी अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश होता. त्या वर्षी दोन्ही देशांमध्ये ९०.१ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत चीनबरोबरील व्यापार वाढल्याने  २०१७ ते २०२० या चार वर्षाच्या काळात, तीन वेळेस चीन हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे. 

ॲप्सवरील बंदी आणि वास्तव  
केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. चीनमधून येणारी गुंतवणूकही नाकारली आहे. कोरोना काळात ‘आत्मनिर्भर’तेची घोषणा केली गेली. मात्र, चिनी बनावटीची अवजड यंत्रे, दूरसंचार उपकरणे आणि घरगुती उपकरणे यावर भारत अद्यापही मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळेच चीनबरोबरील व्यापाराचे प्रमाण मोठे आहे. 

कृषी कायद्यांच्या बाजूने RSS उतरणार मैदानात; सोशल मीडियाद्वारे करणार प्रचार

२०२० मधील चीनची व्यापारी भरारी
- अमेरिकेला मागे टाकून चीन युरोपीय महासंघाचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार
- चीन आणि युरोपीय महासंघामध्ये ७१० अब्ज डॉलरचा व्यापार 
- चीन हा जर्मनीचा सर्वात मोठा व्यापार भागीदार (२५८ अब्ज डॉलर) देखील आहे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com