चीनी ड्रॅगनचा पुन्हा फुत्कार; राजनाथसिंहांच्या अरुणालच दौऱ्याला विरोध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला आज चीनकडून आक्षेप नोंदविण्यात आला.

बीजिंग : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला आज चीनकडून आक्षेप नोंदविण्यात आला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे की, अरुणाचल हा भारताचा भाग आहे, असे चीन मानत नाही. त्यामुळे या प्रदेशात भारतीय अधिकारी किंवा नेत्यांच्या कुठल्याही कृतीला आमचा ठाम विरोध आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

तसेच चीनच्या हिताला धक्का पोचणार नाही, याची भारतीय बाजूकडून खबरदारी घेण्यात यावी. त्यामुळे सीमावादाचा गुंता वाढेल अशी कृती भारताने करू नये. सीमाभागात शांतता आणि स्थिरता प्रदान करण्यासाठी भारताने प्रयत्न करावेत. 

दरम्यान, सीमेबाबत भारत आणि चीनच्या दृष्टिकोनामध्ये भिन्नता असली तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही देशांच्या लष्कराकडून केला जाईल. तेवढी संवेदनशीलता दोन्ही देशाच्या लष्करांकडे आहे, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे अरुणाचल प्रदेशमधील बुम ला येथे बोलताना केले.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र करावा भाजप मुक्त : जोगेंद्र कवाडे 

बुम ला पास येथे भारत आणि चीनच्या दरम्यान कुठलाही तणाव नाही, असेही राजनाथ म्हणाले. संरक्षणमंत्र्यांनी आज अरुणाचल प्रदेशातील भारत - चीन सीमेला लागून असलेल्या बुम ला येथील लष्कराच्या चौकीला भेट दिली. सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये परिपक्व भूमिका निभावल्याबद्दल भारतीय लष्कराचे संरक्षणमंत्र्यांनी या वेळी अभिनंदन केले.

राजनाथ यांनी ट्‌विट करत आपल्या दौऱ्याची माहिती दिली. बुम ला पास येथील परमवीर चक्र विजेते सुभेदार जोगिंदरसिंग यांच्या स्मारकालाही त्यांनी भेट दिली. 1960 च्या युद्धात सुभेदार जोगिदरसिंग यांनी असामान्य पराक्रम गाजवत आपल्या प्राणांची आहुती दिली, असे राजनाथ यांनी ट्‌विटमध्ये नमूद केले आहे. 

गुंता सुटला, आता शरद पवार-सोनिया गांधी अंतिम बैठक

दरम्यान, चीनच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशातील तंवाग येथे "मैत्रीदिना'चे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून लष्कर आणि सामान्य नागरिकांमधील संबंधांना प्रोत्साहन दिले जाते. तवांग येथे झालेल्या या कार्यक्रमात गुरुवारी राजनाथसिंह उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China objects to Rajnath Singhs visit to Arunachal Pradesh region