चीनच्या एक अरब डॉलरच्या गुंतवणुकीनंतरही बंदर ओसच

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

हंबनतोटा या बंदरात सध्या कोणतेही जहाज थांबत नसल्याने त्याची स्थिती एखादा हत्ती पोसल्यासारखी झाली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या "वन बेल्ट वन रोड' या व्यापार आणि पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी होऊनही त्याची काय अवस्था झाली, याचे हंबनतोटा हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

नवी दिल्ली : जागतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हिंद महासागरातील श्रीलंकेच्या अगदी दक्षिणेला असलेले हंबनतोटा बंदराचे संचलन चीनकडून होत असले, तरी या बंदरामध्ये मात्र सध्या कोणतेही जहाज थांबत नाही अशी स्थिती आहे. या महासागरातून दरवर्षी 60 हजार बोटी प्रवास करीत असतात. 

हंबनतोटा या बंदरात सध्या कोणतेही जहाज थांबत नसल्याने त्याची स्थिती एखादा हत्ती पोसल्यासारखी झाली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या "वन बेल्ट वन रोड' या व्यापार आणि पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी होऊनही त्याची काय अवस्था झाली, याचे हंबनतोटा हे उत्कृष्ट उदाहरण आहे. श्रीलंकेने यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले असून, आता त्याची परतफेडसुद्धा ते करू शकत नाहीत, अशी स्थिती झाली आहे.

त्यामुळे त्यांनी आता हे बंदर 99 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर चीनला दिले आहे. या ठिकाणी चीन 500 अब्ज डॉलर खर्च करून पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे. त्यामुळे सामारिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या या बंदरावर चीनचे नियंत्रण राहणार आहे.  

 
 

Web Title: China Ship Dockyard Are Still Empty millions invested