चिनी युद्धनौकांचे उपरोधिक स्वागत ; भारतीय नौदलाकडून 'हॅपी हंटिंग'ची उपमा

पीटीआय
गुरुवार, 19 एप्रिल 2018

भारताच्या प्रत्युत्तरानंतर चीनने स्वत:ची बाजू सावरून धरत आमच्या या युद्धनौका चाचेगिरीविरोधी कारवाईचा भाग म्हणून भारतीय हद्दीमध्ये गेल्याचा दावा केला आहे. चिनी लष्कराने सागरी चाचेगिरीविरोधात वेगाने पावले उचलायला सुरवात केली असून, यासाठी भारतीय सागरी हद्दीमध्येच नाविक तळे उभारली जाणार असून, येथे पाणबुड्यांवर संशोधन करण्यात येईल.

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवरील भारत-चीन दरम्यानचा तणाव तसा नवीन नाही. सीमावर्ती भागामध्ये चीनच्या नेहमीच भारतविरोधी कुरापती सुरू असतात. ड्रॅगनचे हे विस्तारवादी धोरण समुद्रामध्येही दिसून येते. नुकतीच भारतीय सागरी हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या चिनी युद्धनौकांचे भारताने उपरोधिक स्वागत करीत चिनी ड्रॅगनला योग्य तो संदेश दिला. भारतीय नौदलाने चीनच्या या कुरापतींना "हॅपी हंटिंग' असे म्हटले आहे. 

भारताच्या प्रत्युत्तरानंतर चीनने स्वत:ची बाजू सावरून धरत आमच्या या युद्धनौका चाचेगिरीविरोधी कारवाईचा भाग म्हणून भारतीय हद्दीमध्ये गेल्याचा दावा केला आहे. चिनी लष्कराने सागरी चाचेगिरीविरोधात वेगाने पावले उचलायला सुरवात केली असून, यासाठी भारतीय सागरी हद्दीमध्येच नाविक तळे उभारली जाणार असून, येथे पाणबुड्यांवर संशोधन करण्यात येईल. चिनी युद्धनौकांचे ट्विटरवरून स्वागत केल्यानंतर भारतीय नौदलाने आणखी एक नकाशा ट्विट करीत कोणत्या सागरी भागांमध्ये आमच्या युद्धनौका गस्त घालत आहेत, हे चीनला दाखवून दिले. संबंधित भागाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

या सागरी भागावर चोवीस तास लक्ष ठेवण्याची आमची क्षमता असल्याचेही भारतीय नौदलाने या माध्यमातून चीनला दाखवून दिले. मागील काही दिवसांपासून चीनच्या युद्धनौका भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करीत असल्याचे उघड झाले आहे. 

Web Title: China war Ships India says Happy Ending