अण्णा द्रमुकमध्ये आता 'चिनम्मा युग'

यूएनआय
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

चेन्नई - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहूनही नेहमीच कमी महत्त्वाची व्यक्ती म्हणून परिचित असलेल्या पडद्याआड राहिलेल्या व्ही. के. शशिकला यांची अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यामुळे आता पक्षात "अम्मा युग'नंतर "चिनम्मा युग' सुरू झाले आहे.

जयललिता यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून 60 वर्षे वयाच्या शशिकला यांचेच नाव चर्चेत होते आणि आज त्यावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. अण्णा द्रमुकच्या सदस्या म्हणून त्या कार्यरत होत्या; मात्र यापूर्वी त्यांनी पक्षाचे कोणतेही पद भूषविलेले नाही.

  • तमिळनाडूमध्ये वर्चस्व असलेल्या थेवर समाजातील शशिकला यांचा जन्म 1956 रोजी थिरूवरूर जिल्ह्यातील मन्नरगुडी येथे झाला आहे. जयललिता यांच्याशी त्यांची पहिली भेट 1982 साली एका कार्यक्रमात झाली.
  • जयललिता यांच्याशी पहिली भेट झाली, त्या वेळी शशिकला व्हिडिओ रेकॉर्डर म्हणून काम करत होत्या. त्याच काळात त्यांच्या पतीची नोकरी गेली होती आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक पातळीवर संघर्ष करावा लागत होता.
  • शशिकला यांनी तनयानंतर जयललिता यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांच्या रेकॉर्डिंगचे काम सुरू केले. याच काळात त्यांची मैत्री वाढली आणि शशिकला या जयललितांच्या सर्व सभा, तसेच अन्य कार्यक्रमांत दिसू लागल्या.
  • जयललितांचे राजकीय मार्गदर्शक एमजीआर यांचे 1987 मध्ये निधन झाल्यानंतर शशिकला यांनी जयललितांना भावनिक साथ दिली. 1989 मध्ये त्या दिवंगत मुख्यमंत्र्यांचे निवास्थान पोएस गार्डन येथे राहण्यास गेल्या आणि बरोबर 40 स्थानिक मदतनीसही घेऊन गेल्या.
  • शशिकला यांनी त्यांचे पती आणि कुटुंबासह अण्णा द्रमुकच्या कामकाजावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. जयललितांनी त्यांना बहिणीचा दर्जा दिला होता. त्यांच्या संबंधातील मैलाचा दगड ठरलेली घटना म्हणजे जयललिता यांचा वाढविलेला मुलगा सुधारकरन, जो शशिकला यांचा पुतण्या होता. त्याचा विवाह अभिनेते शिवाजी गणेशन यांच्या नातीशी झाला. विवाहनंतर सुधाकरन आणि शशिकला यांच्या संबंधात वितुष्ट आले.
  • 1996 साली अण्णा द्रमुकला राज्यातील निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आणि शशिकला यांना परकी चलन नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अटक झाली. त्या वेळी जयललिताही शशिकलापासून अंतर राखून राहू लागल्या; मात्र लवकरच पुन्हा सर्वकाही सुरळीत झाले.
  • जयललिता आणि शशिकला यांच्या संबंधात 2011 साली मोठी दरी निर्माण झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जयललिता यांना अटक झाल्यानंतर शशिकला आणि तनयांचे कुटुंब सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या वृत्तावरून शशिकला यांना त्यांच्या कुटुंबासह पोएस गार्डन निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांचे संबंध पुन्हा चांगले झाले आणि शशिकला पुन्हा कुटुंबासह जयललितांकडे परतल्या.
  • 2014 मध्ये तामसी भूगंड गैरव्यवहारप्रकरणी जयललितांसह शशिकला यांनाही अटक करण्यात आली आणि त्यांना चार वर्षांची शिक्षा, तसेच 10 कोटी रुपयांचा दंडही झाला.
  • जयललिता आजारी पडल्यानंतर शशिकला पक्षाच्या राजकारणात सहभागी झाल्या. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले.
  • शशिकला यांनी कधीही सभेत भाषण केलेले नाही आणि त्यांच्याकडे कोणताही करिष्मा नाही. तरीही त्यांनी आपल्या हुशारीने पक्षाला एकत्र ठेवले आणि अम्मांच्या निधनानंतर रिक्त झालेले सरचिटणीसपद मिळविले.
Web Title: Chinamma era