चीनचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

चीनच्या सैन्याकडून असे कृत्य जाणूनबुजून करण्यात आले की नाही, हे अद्याप सांगू शकत नसल्याचे भट्ट यांनी सांगितले. याबाबतची माहिती मिळताच चौकशी सुरु करण्यात आली आहे.

डेहराडून - उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत उडताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

चामोलीच्या पोलिस अधीक्षक तृप्ती भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, चामोली जिल्ह्यातील बराहोती भागात चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत उडताना दिसले. आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास हे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत काही मिनिटे फिरत होते. हवाई हद्दीचा हा भंग असून, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीही चिनी सैन्याकडून भारतीय हद्दीत हेलिकॉप्टर आणण्यात आले आहे.

चीनच्या सैन्याकडून असे कृत्य जाणूनबुजून करण्यात आले की नाही, हे अद्याप सांगू शकत नसल्याचे भट्ट यांनी सांगितले. याबाबतची माहिती मिळताच चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार
सांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का​
नाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'​
'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''​
'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'​

Web Title: Chinese chopper sighted in Indian airspace