भारतातील व्हॉट्‌सऍप युजर्स चिनी हॅकर्सचे लक्ष्य:लष्कराचा इशारा

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

तुमच्या डिजिटल जगात घुसण्यासाठी चिनी हॅकर्सकडून सर्व मार्ग वापरण्यात येत आहेत. व्हॉट्‌सऍप ग्रुप हा तुमच्या सिस्टीममध्ये हॅकींग करण्याचा नवा मार्ग आहे. +86 या नंबरने सुरु होणारे चिनी क्रमांक व्हॉट्‌सऍप ग्रुपमध्ये घुसून सर्व माहिती चोरली जाण्याची शक्‍यता आहे

बंगळूर - भारतामधील व्हॉट्‌सऍप युजर्स चिनी हॅकर्सचे लक्ष्य ठरत असल्याचा इशारा भारतीय लष्कराकडून देण्यात आला आहे. याआधी, सुमारे चार महिन्यांपूर्वी लष्कराकडून सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांनी व्हॉट्‌सऍपसहित विविध ऍप्लिकेशन्स वापरताना काळजी घ्यावी, असा इशारा दिला होता.

""तुमच्या डिजिटल जगात घुसण्यासाठी चिनी हॅकर्सकडून सर्व मार्ग वापरण्यात येत आहेत. व्हॉट्‌सऍप ग्रुप हा तुमच्या सिस्टीममध्ये हॅकींग करण्याचा नवा मार्ग आहे. +86 या नंबरने सुरु होणारे चिनी क्रमांक व्हॉट्‌सऍप ग्रुपमध्ये घुसून सर्व माहिती चोरली जाण्याची शक्‍यता आहे,'' असा स्पष्ट इशारा लष्कराकडून देण्यात आला आहे. याचबरोबर, सिम बदलले असल्यास ते संपूर्णत: नष्ट करण्यात यावे, असेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Chinese hackers targeting WhatsApp: Indian Army