#ChorPMChupHai ट्रेंड ट्विटरवर टॉप टेनमध्ये

सोमवार, 24 सप्टेंबर 2018

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. यानंतर #ChorPMChupHai असा ट्रेंड ट्विटरवर टॉप टेनमध्ये आला आहे.

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. यानंतर #ChorPMChupHai असा ट्रेंड ट्विटरवर टॉप टेनमध्ये आला आहे.
 

राफेल विमान खरेदी प्रकरणावरून नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींनी चांगलेच लक्ष केले आहे. मोदींनी म्हटले होते की, मी या देशाचा पंतप्रधान नाही, तर चौकीदार आहे. राहुल यांनी या वाक्याचा संदर्भ देत 'हिंदुस्थान का चौकीदार ही भागीदार है', अशा शब्दात मोदींवर टीका करत त्यांची खिल्ली उडवली होती. राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असताना नरेंद्र मोदी या मुद्यावर काहीच बोलताना दिसत नाहीत.
 

या संदर्भात अनेकांनी ट्विटरवर बोलताना असे म्हटले आहे की, विरोधी पक्षाच्या प्रत्येक प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचे नेते काही ना काही उत्तर देताना दिसत आहेत परंतु, पंतप्रधान मोदी मात्र शांत आहेत, ते काहीच बोलत नाहीत. भाजपनेते रवीशंकर प्रसाद यांच्यासह अनेकांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर #ChorPMChupHai या हॅशटॅगखाली नेटिझन्सनी छोटे-छोटे व्हिडिओ क्लिप्स, छायाचित्रे अपलोड केली आहेत. यामुळे #ChorPMChupHai हा ट्रेंड टॉप टेनमध्ये दिसत आहे.
 

Web Title: #ChorPMChupHai Top Trend on Twitter