विहिंप, बजरंग दल अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांना अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) सीआयएने राष्ट्रवादी संघटना म्हणून संबोधित केले आहे. 

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांना अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) सीआयएने राष्ट्रवादी संघटना म्हणून संबोधित केले आहे. 

'सीआयए' या गुप्तचर संस्थेकडून 'वर्ल्ड फॅक्टबुक' ही वार्षिक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये अर्थव्यवस्था, ऊर्जा, भौगोलिकता, संदेशवहन, वाहतूक, इतिहास, सरकार आणि लष्कर यांसह अशा 267 घटकांचा सध्याच्या स्थितीनुसार आढावा घेण्यात आला. तसेच यामध्ये काश्मीरमधील 'हुरियत कॉन्फरन्स' या पक्षाला फुटीरतावादी म्हणून संबोधण्यात आले. तर राज्यसभेचे माजी खासदार मौलाना मेहमूद मदानी यांच्या उलेमा-ए-हिंद या संघटनेला धार्मिक संघटनेचा दर्जा देण्यात आला असून, स्वयंसेवक संघाचा उल्लेख 'राष्ट्रवादी' संघटना असा करण्यात आला आहे. मात्र, आरएसएसचा भाग असलेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला दहशतवादी संघटना ठरविण्यात आले आहे.

Web Title: CIA calls Bajrang Dal and VHP militant religious organisations