'स्मृती इराणींच्या शिक्षणाची माहिती जाहीर करा'

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

दिल्ली विद्यापीठातून 1978 मध्ये बीएची पदवी घेतल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितलेले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून माहिती व प्रसारण मंत्रालय काढून घेण्यात आले होते.

नवी दिल्ली - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या दहावी आणि बारावी शिक्षणाची सर्व माहिती जाहीर करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आयोगाकडून केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाला (सीबीएसई) देण्यात आले आहेत.

माहिती आयोगाने सीबीएसई बोर्डाची याचिकाही फेटाळली आहे. या याचिकेत म्हटले होते, की इराणी यांनी घेतेलेल्या शिक्षणाबाबतची माहिती वैयक्तिक असून, ती जाहीर करू शकत नाही. वस्त्रोद्योग मंत्रालय आणि दिल्लीतील होली चाईल्ड ऑक्झिलियम शाळेलाही माहिती जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच स्मृती इराणी यांनी अजमेर येथून सीबीएसई बोर्डात दिलेल्या परीक्षेचा रोल नंबर, संदर्भ क्रमांक प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. या दस्तावेजांमुळे त्यांच्या शिक्षणाबाबतची माहिती समोर येण्यास मदत होणार आहे. ही सर्व माहिती 60 दिवसांत जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्ली विद्यापीठातून 1978 मध्ये बीएची पदवी घेतल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितलेले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून माहिती व प्रसारण मंत्रालय काढून घेण्यात आले होते. विशेष म्हणजे याचवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आहे. आम आदमी पक्षाकडून याच पदवीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

Web Title: CIC directs CBSE to allow inspection of Smriti Irani’s Class 10, 12 school records