'CID' मधील 'एसीपी प्रद्युम्न'चा मृत्यू!

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

अलीकडच्या काही वर्षांतील सर्वांत गाजलेल्या आणि सर्वांत जास्त काळ चाललेल्या मालिकांपैकी एक असलेल्या 'सीआयडी’ मालिकेतील शिवाजी साटम यांनी साकारलेल्या एसीपी प्रद्युम्नचे निधन झाले आहे. हे केवळ मालिकेतील त्या पात्राचे निधन आहे, अभिनेत्याचे नव्हे त्यामुळे साटम यांच्या चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! 

'सीआयडी' छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. याच 'सीआयडी'मधील एसीपी प्रद्युम्न यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
शिवाजी साटम हे गेल्या 18 वर्षांपासून एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका हे करत आहेत. ही मालिकेतील प्रमुख भूमिका आहे. शिवाजी साटम या खऱ्या नावापेक्षा एसीपी प्रद्युम्न या नावाने लोकांमध्ये अधिक परिचित आहेत. 

26 डिसेंबर रोजी ऑन एअर होणाऱ्या शोमध्ये एसीपी प्रद्युम्न यांचे निधन होणार आहे. याबरोबरच त्यांची मालिकेमधील ही भूमिका कायमस्वरुपी पडद्याआड जाणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या मालिकेचे प्रक्षेपण संपूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 

अनेकांच्या खून आणि गूढ मृत्यूंचे गूढ उकलणाऱ्या एसीपी प्रद्युम्न यांच्या निधनाचे रहस्य जाणून घ्या. त्यांच्या निधनाचे कारण म्हणजे या मालिकेमध्ये काम करणारे कलाकार आपल्या मानधनामध्ये तिप्पट वाढ करण्याची मागणी करत आहेत. या मागणीमुळे शो आणि चॅनल प्रोड्यूसरने ही मालिका एक आठवडा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे या माहितीला दुजोरा दिलेला नाही.
 
Web Title: CID’s ACP Pradyuman DIES due to heart attack!