बंगळूरमध्ये जवान सुरेश गायकवाड यांची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

सुरेश गायकवाड यांनी घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगळूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

बंगळूर - बंगळूरमधील विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान सुरेश गायकवाड (वय 28) यांनी स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरमधील केम्पा गौडा विमानतळावरील गेट नंबर 1 येथे आज (सोमवार) सकाळी नेहमीप्रमाणे ते सेवेस आले होते. त्यानंतर थोड्यावेळातच त्यांनी त्यांच्याजवळील सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. या जवानाचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला आहे. या जवानाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच त्यांच्याकडे कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

सुरेश गायकवाड यांनी घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगळूर पोलिस अधिक तपास करत आहेत. बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी सीआयएसएफच्या एका जवानाने सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता.

Web Title: CISF jawan kills self in Bengaluru airport