'सीआयएसएफ'च्या जवानाकडून सहकाऱयांवर गोळीबार

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

औरंगाबाद (बिहार)- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने सहकाऱयांवर केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटनापासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगाबाद येथे गोळीबाराची घटना घडली. 'सीआयएसएफ' एका जवानाने सहकाऱयांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबार करणाऱया जवानाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: CISF Personnel Fires At Colleagues In Bihar