
नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमध्ये पेटलेला आंदोलनाचा वणवा आज दुसऱ्या दिवशी आणखी उग्र झाला. सीलमपूर-जाफराबाद परिसरामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत वाहनांची मोडतोड केली. या वेळी काही वाहनांना आगही लावण्यात आली. संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर पाच मेट्रो स्थानके तातडीने बंद करण्यात आली होती.
पत्रकारांच्या मृत्यूचे प्रमाण घटले; खून होण्याच्या प्रमाणात मात्र वाढ
सीलमपूर परिसरामध्ये आज (ता.१७) दुपारी बारा वाजता आंदोलनाला सुरवात झाली. या वेळी आंदोलकांनी परिवहन खात्याच्या बसला लक्ष्य करत दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये काही पोलिस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. जामियातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि नागरिकत्व कायद्यास विरोध करण्यासाठी हे शेकडो आंदोलक एकवटले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दुसरीकडे "जामिया'तील हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज दहा जणांना अटक केली असून, यामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपींचा समावेश असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या प्रकरणी एकाही विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली नाही. यातील सहा आरोपींना साकेत न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नागरिकत्व कायद्यावरून देशभरात विविध ठिकाणांवर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जावी, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्या याचिका न्यायालयाने आज फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उच्च न्यायालयांत जाण्याचे निर्देश दिले.
दिवसभरात नेमकं काय घडलं?