
CJI DY Chandrachud : थोडा तरी आदर ठेवा, घरी देखील असेच वागता का? वकीलावर भडकले चंद्रचूड
चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाय चंद्रचूड मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी अनेक प्रकरणावर महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत. कोर्टातील सुनावणी दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यांची देखील कोर्टाबाहेर चर्चा होते. दरम्यान शुक्रवारी सीजेआय चंद्रचूड कोर्टातील एक वकीलावर भडकल्याचा प्रकार समोर आला आहे.
बार अँड बेंच वेबसाईटनुसार सीजेआय चंद्रचूड यांनी वकीलांच्या वर्तुणूकीवर आक्षेप घेत त्यांना चांगलंच सुनावलं. चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही काय करत आहात? तुमच्यासमोर एक महिला आहे. थोडा तरी सन्मान बाळगा. तुम्ही तुमच्या घरी आणि घराबाहेर देखील असेच वागता का? तुम्ही माइक घेण्यसाठी हात तिच्याभोवती ठेवत आहात. परत जा आणि उद्या पुन्हा या. थोडा आदर ठेवा.
याआधी देखील सीजेआय चंद्रचूड यांनी अशा प्रकरणांवर नाराजी व्यक्त केली होती. मागील माहिन्यांत एक वकीलाला देखील असाच इशारा दिला होता. सीजेआय यांच्याकडून वकीलास सांगण्यात आले होते की प्रकरण १७ एप्रील रोजी सूचीबद्ध केलं जाईल. मात्र वकीलांने प्रकरण दुसऱ्या पीठासमोर मांडण्याची परवानगी मागीतली. ज्यावर सीजेआय नारागी व्यक्त केली होती.
तेव्हा सीजेआय म्हणाले की, तुमची तारीख १७ आहे, तुम्ही १४ तारीख मिळवण्यासाठी दुसऱ्या कुठल्यातरी पीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करू इच्छिता? जर हे १७ तारखेस लीस्टेड असेल तर ते १७ तारखेलाच येईल. माझ्या आधीकारात ढवळाढवळ करू नका. माझ्यासमोर अशा युक्त्या करू नका. तुम्ही आधी इथे आणि नंतर दुसऱ्या तारखेसाठी इतरत्र त्याचा उल्लेख करू शकत नाही. यानतर वकीलाने सीजेआय आणि बेंच समोर खेद व्यक्त केला.