लॉकडाऊन लावावा का? दिल्ली प्रदुषणावर सुप्रीम कोर्टाची केंद्राला विचारणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊन लावावा का? दिल्ली प्रदुषणावर सुप्रीम कोर्टाची केंद्राला विचारणा

लॉकडाऊन लावावा का? दिल्ली प्रदुषणावर सुप्रीम कोर्टाची केंद्राला विचारणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली: दिल्लीमधील हवा प्रदुषणाची (Air quality in Delhi) समस्या इतकी तीव्र झाली आहे की, त्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. वायू प्रदुषणावर तातडीचा उपाय म्हणून काही दिवसांसाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात यावा का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्र सरकारला केली आहे. AQI ची पातळी दिवसेंदिवस वाढत असून प्रदुषित हवेमध्ये राहणं मुश्किलीचं झालं आहे. एन व्ही रमणा (N V Ramana) यांच्या नेतृत्वाखाली न्यायपीठाने ही विचारणा केली आहे. (CJI led Supreme Court bench asks if lockdown needed to tackle pollution)

हेही वाचा: अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री

AQI 500 वरुन 200 पर्यंत कसा कमी करायचा या संदर्भात सांगा, काही तातडीचे उपाय राबवा. यासाठी दोन दिवसांचा लॉकडाऊन अथवा तत्सम काही उपाय राबवण्याचा विचार तुम्ही करु शकाल का? लोकांनी जीवंत राहायचं कसं? सध्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत विखारी झाली असून येत्या दोन-तीन दिवसांत ती आणखी खालावेल. त्यामुळे तातडीने निर्णय घ्या. आपण दिर्घकालीन दूरगामी सकारात्मक परिणामांसाठीच्या उपायांवर नंतर विचार करु, सध्या तातडीच्या एखाद्या उपायाची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाने केंद्राला म्हटलंय.

हवा प्रदुषणाचा विषय हा अत्यंत गंभीर मामला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. लोकांना घरात देखील मास्क घालून बसावं लागत आहे. तुम्ही पाहताय की, परिस्थिती किती गंभीर आहे. इतकंच काय लोकांना घरात देखील मास्क घालून बसावं लागतंय, असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय.

हेही वाचा: अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव

दिल्ली सरकारने स्मॉग टॉवर्स आणि इमिशन कंट्रोल प्रोजेक्ट्स लागू करणार असल्याचं सांगितलं होतं त्याचं काय झालं? तुम्ही राजधानीतील सगळ्या शाळा उघडल्या आहेत आणि आता प्रदुषणाची समस्या पुढे आहे. हे केंद्राचे नव्हे तर तुमचे अधिकारक्षेत्र आहे. त्याबाबत काय घडतंय? याबाबतच्या विचारणाही कोर्टाने आप सरकारला केल्या आहेत.

loading image
go to top