सरन्यायाधीशांना खटल्यांच्या वाटपाचा अधिकार : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

''भारताच्या सरन्यायाधीशांच्या 'मास्टर ऑफ रोस्टर'बाबत संविधानात कोणतीही तरतूद नाही. संविधानामध्ये सरन्यायाधीशांची भूमिका ही 'रोस्टरचा प्रमुख' म्हणून आहे. तरी सरन्यायाधीश न्यायालयाची शिस्त व शिष्टाचार टिकवून ठेवण्यासाठी आधारित आहेत. तसेच सरन्यायाधीशांना खटल्यांचे वाटप करण्याचा अधिकार आहे''.

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश 'मास्टर ऑफ रोस्टर' (खटल्यांचे वाटपप्रमुख) आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या विविध खंडपीठांकडे खटल्यांचे वाटप करण्याचा अधिकार सरन्यायाधीशांकडे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे वाटप सरन्यायाधीशांकडून करण्यात येत असल्याने याला आव्हान देणारी याचिका माजी कायदामंत्री शांतीभूषण यांनी दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे स्पष्ट केले. याबाबत वकिलाने याचिकेत म्हटले, की 'मास्टर ऑफ रोस्टर' ही 'विसंगत आणि निष्कलंक' शक्ती असू शकत नाही. काही संवेदनशील खटल्यांची सुनावणी करण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी आणखी चार न्यायाधीशांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. याप्रकरणाची याचिका न्यायाधीश ए. के. सिक्री आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.  

तसेच याबाबत सिक्री यांनी सांगितले, की भारताच्या सरन्यायाधीशांच्या 'मास्टर ऑफ रोस्टर'बाबत संविधानात कोणतीही तरतूद नाही. संविधानामध्ये सरन्यायाधीशांची भूमिका ही 'रोस्टरचा प्रमुख' म्हणून आहे. तरी सरन्यायाधीश न्यायालयाची शिस्त व शिष्टाचार टिकवून ठेवण्यासाठी आधारित आहेत. तसेच सरन्यायाधीशांना खटल्यांचे वाटप करण्याचा अधिकार आहे, असेही सिक्री यांनी सांगितले.
 

Web Title: CJI is master of roster and has authority to allocate cases says Supreme Court