मोदी सरकारच्या कार्यकाळात दोन हजार जातीय दंगली

Claims of BJP not True says Fact Checkers 389 Dead in Over 2000 Communal Incidents
Claims of BJP not True says Fact Checkers 389 Dead in Over 2000 Communal Incidents

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येऊन आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या मागील चार वर्षांत देशामध्ये जातीय हिंसाचार झाला नसल्याचा दावा केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला. मात्र, त्यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे 'फॅक्टचेकर्स' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. तसेच 2014 पासून देशात 2000 जातीय हिंसाचार झाले असून, यामध्ये 389 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

मुख्तार अब्बास नक्वी यांनी 2 जुलै, 2018 मध्ये दावा केला होता, की मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून (2014पासून) देशात कोणतीही मोठी जातीय हिंसाचाराची घटना घडली नाही. तसेच गृहमंत्रालयाच्या मते, फक्त एक जातीय हिंसाचाराची घटना घडली होती. मात्र, या हिंसाचारात पाचपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला किंवा 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले. 

या कालावधीत तीन गंभीर जातीय हिंचाचार झाल्याची बाब या अहवालात समोर आली. पश्चिम बंगालमधील बदुरिया-बसिरहाट पूर्व भागात तर हझीनगरमध्ये 2016 मध्ये तर उत्तरप्रदेशच्या सहाराणपूर जिल्ह्यात 2014 मध्ये हिंसाचार माजला होता. मात्र, गृहमंत्रालयाच्या वार्षिक अहवालात कोणतीही गंभीर हिंसाचाराची घटना 2015 मध्ये झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

फॅक्टचेकर्सने याबाबत सर्वेक्षण केले असून, यामध्ये 2017 वर्षाअखेरपर्यंत 2920 जातीय हिंसाचार झाल्याची नोंद झाली. यामध्ये 389 लोकांचा मृत्यू झाला तर 8890 जण जखमी झाले. याबाबतची माहिती 6 आणि 7 फेब्रुवारी 2017 मध्ये देण्यात आली.

दरम्यान, लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तरप्रदेश सर्वात मोठे राज्य असून, या राज्यात गेल्या चार वर्षांत 645 हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले. त्यानंतर कर्नाटकमध्ये 379 तर महाराष्ट्रात 316 जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्याचे या अहवालात समोर आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com