तिहार कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; 17 जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

नवी दिल्ली- तिहार कारागृहात दोन गटांमध्ये गुरुवारी (ता. 2) रात्री झालेल्या हाणामारीमध्ये 17 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (शुक्रवार) दिली.

प्रसारमाध्यमे व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील दोन गटांमध्ये गुरुवारी रात्री एकच्या सुमारास भांडणास सुरवात झाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कारागृहाचे अधिकारी व पोलिसांनी भांडणे मिटवली. दोन्ही गटांमधील 17 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांना कारागृहातील रुग्णालयात तर 11 जणांना सफदरजंग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कैद्यांनी भांडणावेळी ब्लेडसारख्या धारदार शस्त्रांचा वापर केल्याचे आढळून आले आहे. यामुळे अनेक जखमींना गंभीर दुखापत झाली आहे. कैद्यांकडे ब्लेड कोठून आले, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे, असे पोलिस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, गोवा येथील कारागृहामध्ये यापुर्वी दोन गटांमध्ये भांडण झाले होते. यावेळी एका कैद्याचा मृत्यू झाला होता तर 9 जण जखमी झाले होते.

Web Title: Clash at Delhi’s Tihar jail: 17 prisoners injured