आरएसएसची शाखा सुरू असताना दोन गटात तुंबळ हाणामारी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

देशभरात अनेक ठिकाणी यापूर्वीही संघाची शाखा सुरू असताना हिंसाचार आणि ताण-तणाव निर्माण होणाऱ्या घटना घडल्या आहेत. बुंदी येथे घडलेली घटना ही कोणत्या कारणामुळे घडली याचा तपास पोलिस करत आहेत.

बुंदी (जयपूर) : राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) शाखा सुरू असताना दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना काल (गुरुवार) घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.  

"रा.स्व.संघाची शाखा सुरू असताना शेजारील उद्यानात मुस्लिम समाजाचाही एक कार्यक्रम सुरू होता. तेव्हा अचानक दोन गटांत तणाव निर्माण होऊन हाणामारीस सुरुवात झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे,'' अशी माहिती बुंदीचे तहसीलदार बी.एस. राठोड यांनी दिली.  

देशभरात अनेक ठिकाणी यापूर्वीही संघाची शाखा सुरू असताना हिंसाचार आणि ताण-तणाव निर्माण होणाऱ्या घटना घडल्या आहेत. बुंदी येथे घडलेली घटना ही कोणत्या कारणामुळे घडली याचा तपास पोलिस करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clashes between two groups during RSS shakha in Bundi district