गुजरातमधील शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याकडून नववीच्या विद्यार्थ्याची हत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

गुजरातमध्ये एका विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या शाळेतीलच इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला.

अहमदाबाद : दहावीच्या एका विद्यार्थ्याने शाळेतीलच इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गुजरात पोलिसांनी अटक केली. नववीतील विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेतील स्वच्छतागृहात सापडला.

गुजरातमध्ये एका विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या शाळेतीलच इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला. शाळेतील चार विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करताना पाहिल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत पोलिस आयुक्त मनोज शशिधर यांनी सांगितले, की या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात येत असून, या भांडणामध्ये आणखी दोघांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, या हत्येचे नेमके कारण काय, याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. 

दरम्यान,  मागील वर्षी हरियानातील गुडगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. त्याचाही मृतदेह शाळेतील स्वच्छतागृहात आढळला होता. त्यानंतर आता ही हत्या झाल्याचे उघडकीस आले.

Web Title: Class 10 student accused of killing junior in Vadodara school toilet arrested