विद्यार्थीनीवर पाच जणांनी केला तीन दिवस बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

मनाली (हिमाचल प्रदेश): इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर पाच जणांनी तीन दिवस सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे. पीडीत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी नोंदवली होती, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

कुल्लूचे पोलिस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडीत मुलगी 17 जून रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. 20 जून रोजी ती आढळून आली. तीन दिवस पाच जणांनी बलात्कार केल्याचे तिने सांगितले. बलात्कार करणाऱयांमध्ये तीन युवक हे पंजाबमधील तर दोघे जण स्थानिक आहेत. पंजांबमधून तीन जणांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघे पळून गेले आहेत.'

फरार झालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Class 12 Girl Allegedly Gang Raped By Five Men For Three Days In Himachal