आठवीच्या पुस्तकात 'बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक' असा वादग्रस्त उल्लेख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

समाजशास्त्राच्या संदर्भ पुस्तकात 'बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक' असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक यांचा अपमान केल्याने या प्रकाराबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली - मथुरेतील एका प्रकाशकाने छापलेल्या आठवीच्या समाजशास्त्राच्या संदर्भ पुस्तकात 'बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक' असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक यांचा अपमान केल्याने या प्रकाराबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

'अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ' या धड्यामध्ये टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला आहे. 'टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात असे यामध्ये म्हटले आहे. ब्रिटीश अधिकाऱ्यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे पुस्तकात म्हटले गेले आहे.  

दरम्यान, राजस्थान सरकारने याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Class 8 reference book in Rajasthan calls Bal Gangadhar Tilak ‘father of terrorism’