मुलीशी मैत्री केल्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा खून

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

बंगळूर - एका चौदा वर्षाच्या दहावीतील विद्यार्थ्याचा त्याच्याच शाळेतील माजी विद्यार्थ्याने शाळेतील एका मुलीशी मैत्री ठेवल्याच्या रागातून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बंगळूर - एका चौदा वर्षाच्या दहावीतील विद्यार्थ्याचा त्याच्याच शाळेतील माजी विद्यार्थ्याने शाळेतील एका मुलीशी मैत्री ठेवल्याच्या रागातून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बंगळूरमधील एलाहंका येथील शासकीय उच्च माध्यमिक मुलांच्या शाळेत ही घटना घडली. तेथे लवकरच दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. त्यासाठी सोमवारपासून शाळेला सुट्या लागल्या आहेत. सोमवारी दुपारी शाळेत निरोप समारंभ सुरू होता. शाळेतील एका मुलीशी हंसराजची मैत्री होती. या मैत्रीचा शाळा सोडलेल्या शाळेतील एका माजी विद्यार्थ्याला राग होता. गेल्या पंधरा दिवसांपासून हंसराज आणि त्या माजी विद्यार्थ्याची धुसफूस सुरू होती. निरोप समारंभामध्ये हंसराजला काही पारितोषिके मिळाली.

आरोपी माजी विद्यार्थ्यासह त्याच्यासोबत आलेल्या अन्य काही विद्यार्थ्यांनी हंसराजला पारितोषिकांवरून चिडवण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाले. त्यातून रागाच्या भरात शहरातील मुख्य रस्त्यावर रेल्वेरूळाजवळ हंसराजला चाकूने अनेकदा भोसकण्यात आले. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी हंसराजला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सर्व आरोपी हे अल्पवयीन असून सर्व जण फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: Class X student stabbed to death outside school in Bengaluru