स्वच्छता कामगाराच्या अंत्यविधीसाठी कुटुंब हतबल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कायमच गंभीर आणि दुर्लक्षित राहिला आहे. अशा घटना घडतात, दोन दिवस शोकांतिका दर्शविली जाते. मात्र पुढे अशा घटना होऊ नये यासाठीची दक्षता घेतली जात नाही. अनिल याच दक्षता न घेतलेल्या कामाचा बळी पडले.

दिल्ली : येथील पश्चिम डबरी परिसरात अनिल नामक 28 वर्षीय स्वच्छता कामगाराचा 20 फुट खोल गटारात पडून मृत्यू झाला. अनिल यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलं असे कुटुंब पोरके झाले. दिल्लीत एका भाड्याच्या घरात हे कुटुंब राहत होते. 

स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कायमच गंभीर आणि दुर्लक्षित राहिला आहे. अशा घटना घडतात, दोन दिवस शोकांतिका दर्शविली जाते. मात्र पुढे अशा घटना होऊ नये यासाठीची दक्षता घेतली जात नाही. अनिल याच दक्षता न घेतलेल्या कामाचा बळी पडले. 14 सप्टेंबरला अनिल यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांना गटार साफ करण्यासाठी बोलावले होते. अनिल हे गटारात उतरत होते. त्यांच्या कंबरेला दोरी बांधली होती. पण गटारात उतरताना दोरी मध्येच तुटली आणि ज्यामुळे अनिल 20 फुट खोल गटाराच्या खड्ड्यात जाऊन पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

अनिलच्या मृत्यूची चर्चा :
ट्विटरवर शिव सन्नी नामक पत्रकार यांनी अनिल च्या शवाजवळ उभा असलेला त्यांच्या मुलाचा फोटो अपलोड केला आहे. 'अनिल यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या पार्थिवावरील कापड बाजूला करुन त्यांच्या चेहऱ्यावर आपले हात ठेऊन रडत आहे.' असे या फोटोत दिसत आहे. हा ह्रद्यद्रावक फोटो काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल झाला. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सेलेब्रिटींनी हा फोटो रीट्विट केला आहे. 

 

गेल्या महिन्यातही दिल्लीत अशीच एक घटना घडली होती. ज्यात कोणत्याही सुरक्षेविना स्वच्छता कामगार गटारात उतरले आणि त्यांचा मृत्यू झाला. इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार, 'सरकार आणि खासगी कंपनी याप्रकारे जीव गमावणाऱ्या कामगारांसाठी कोणतीही तरतूद करु शकत नाही आहे.' अनिलच्या मृत्यूची बातमी जसजशी पसरत गेली त्यानंतर सोशल मिडीयावर अनिलच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. अनिलचे अंत्यसंस्कार पार पाडू शकतील एवढेही त्यांचे कुटुंबिय आर्थिकरित्या सबल नाही. 

Cleaner dies in Delhi sewer

 

मुंबई येथील केट्टो ही सामाजिक संस्था सोशल मिडीयाद्वारे क्राउड फंडींग करते. अनिलच्या कुटुंबासाठी सध्या ही संस्था आर्थिक मदत जमा करत आहे. आतापर्यंत लोकांनी 50 लाख रुपये या कुटुंबासाठी केट्टोकडे जमा केले आहेत. घटना झाल्यानंतर पंधरा दिवसात निधी जमा करुन ही संस्था या कुटुंबियांना देणार आहे. या निधीत पैसे, गरजेच्या वस्तू आणि भविष्यासाठी काही तरतूद यांचा समावेश आहे. यापैकी आपण सढळ हाताने मदत करु शकणार आहात. 'दिल्लीत स्वच्छता कामगाराचा मृत्यू, कुटुंब त्यांचे अंत्यविधी करु शकेल इतकेही आर्थिक परिस्थिती नाही. कृपया मदत करावी!' (Cleaner dies in Delhi sewer, family can't afford to even cremate him. Please support!) या नावाने निधी जमा केला जात आहे. 

Web Title: Cleaner dies in Delhi sewer family cant afford to even cremate him