केरळमध्ये स्वच्छतेवर भर 

पीटीआय
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

तिरुअनंतपुरम (पीटीआय) : पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बचावण्याची मोहीम संपण्याच्या मार्गावर असताना केरळ सरकारने आज आपले लक्ष जोरदार पावसामुळे राज्यात नुकसान झालेल्या घरे आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर केंद्रित केले आहे. 

दरम्यान, नदी काठाजवळ असलेल्या काही भागातील पाणी ओसरू लागल्याने अलापुझामधील कुट्टनाड अजूनही पाण्याखाली आहे. आरोग्य आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या 3 हजारांपेक्षा अधिक पथकांनी घरे आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेस सुरवात केली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

प्राथमिक अंदाजानुसार, पुरामुळे केरळचे 19 हजार 512 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्याने केंद्राकडे 2 हजार कोटी रुपयांची मदत मागितली होती. मात्र, केंद्राने सध्या तरी 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. ऑनलाइन आणि डिपॉझिटद्वारे मुख्यमंत्री आपत्ती सहायता निधीत आतापर्यंत 309 कोटी रुपये जमा झाले आहेत. संयुक्त अरब अमिराती सरकारने सुमारे 700 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

जास्तीत जास्त अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध अजूनही घेतला जात आहे. 
- पिनाराई विजयन, केरळचे मुख्यमंत्री 

छावण्यांमध्ये 14.50 लाख लोक 
आपत्ती व्यवस्थापनाच्या राज्य नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑगस्टपासून पूरसंबंधित घटनांमध्ये 231 लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले असून, 32 लोक बेपत्ता आहेत. 3.91 लाख कुटुंबातील जवळपास 14.50 लाख लोकांनी राज्यातील सुमारे 3 हजार 879 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील सर्वाधिक 5.32 लाख लोकांनी 850 छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. 

Web Title: Cleanliness in Kerala