स्वच्छता दूतांमुळे कुंभमेळा बनतोय 'दिव्य'

स्वच्छता दूतांमुळे कुंभमेळा बनतोय 'दिव्य'

प्रयागराज : उत्तर प्रदेश सरकारने आपल्या आयोजनाने हा अर्धकुंभमेळा भव्य केला असला, तरी येथील "स्वच्छता दूतां'च्या सेवेमुळे तो दिव्यही बनला आहे. येथील स्वच्छता दूत त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक काळ काम करीत परिसर स्वच्छ राहून वातावरण चांगले ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. 

कुंभमेळ्याच्या परिसरात एक लाख शौचालये उभारण्यात आली असून, उघड्यावर शौचास जाणे टाळण्यासाठी ही शौचालये स्वच्छ राहतील, याची काळजी स्वच्छता दूत घेत आहेत. या "तंबूंच्या शहरात' जवळपास वीस हजार कचरापेट्याही ठेवण्यात आल्या आहेत. वेळच्या वेळी यातील कचरा कुंभमेळ्याच्या परिसरातून बाहेर नेला जातो. सरकारी आकडेवारीनुसार, पंधरा हजारांहून अधिक स्वच्छता कर्मचारी या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. शिवाय अतिरिक्त दोन हजार जण इतरत्र पडलेला कचरा उचलत परिसर स्वच्छ ठेवत आहेत. या सर्वांची कामाची अधिकृत वेळ आठ तास असतानाही ते रोजच 10 ते 12 तास काम करीत आहेत.

कामाचा ताण अधिक असला, तरी येणारे भाविक आम्ही केलेल्या स्वच्छतेचे कौतुक करतात, त्या वेळी आनंद वाटतो आणि कामाचा उत्साहही वाढतो, अशी भावना एका स्वच्छता दूताने व्यक्त केली आहे. 

कॅबिनेटची बैठक संगमावर? 

राज्याच्या मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यादरम्यान संगमावरच राज्य सरकारच्या कॅबिनेटची बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. असे झाल्यास कुंभमेळ्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याची ही ऐतिहासिक घटना असेल.

1962 ला नैनितालला बैठक झाल्यानंतर लखनौबाहेरही कधी बैठक झालेली नव्हती. ही बैठक 28 अथवा 29 जानेवारीला होण्याचा अंदाज असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर काही मंत्रिगण संगमावर स्नान करून बैठकीत सहभागी होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीत कुंभमेळ्याशी संबंधित निर्णय घेतले जाण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com