मदरसे बंद करा : रिझवी

मदरसे बंद करा : रिझवी

लखनौ : मुस्लिम बालकांवर "इसिस'सारख्या दहशतवादी संघटनांचा प्रभाव पडू नये, यासाठी देशातील प्राथमिक पातळीवरील सर्व मदरसे बंद करावेत, अशी मागणी करणारे पत्र उत्तर प्रदेशातील मध्यवर्ती वक्‍फ बोर्डाचे प्रमुख वासीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे. 

"मुस्लिम मुलांची इच्छा असल्यास उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मदरशांमध्ये प्रवेश घ्यावा. लहान मुलांना दहशतवादी सहजपणे लक्ष्य करीत त्यांचा वापर करून घेतात. इसिस ही विघातक संघटना असून, जगभरातील मुस्लिमांवर प्रभाव टाकण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. देशातील मदरसे बंद केले नाहीत, तर भारतातील अर्धे मुस्लिम इसिसचे समर्थक होतील,' असे रिझवी यांनी पत्रात म्हटले आहे. काश्‍मीरमध्ये इसिसला मिळत असलेला पाठिंबा हे याचेच निदर्शक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

"ग्रामीण भागातही अनेक प्राथमिक मदरशांमध्ये देणग्यांच्या आडून मुस्लिम मुलांवर कट्टरतावादी विचारसरणीचा मारा करून त्यांचे भविष्य धोक्‍यात आणले जात आहे. मुस्लिम मुलांना सुरवातीला सर्वसाधारण शिक्षण दिल्यास ते समाजातील इतर घटकांमध्ये मिसळतील. याचा त्यांना भविष्यात फायदाच होईल,' असे रिझवी यांनी पत्रात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com