उत्तराखंडमध्ये ढगफुटी; तर दिल्ली, चंदीगढला चक्रीवादळाचा तडाखा

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

दरम्यान, सायंकाळच्या वेळेतील ही ढगफुटी दिल्ली-एनसीआर, चंदीगढ आणि आजूबाजूच्या परिसरात झाली. पावसाच्या जोरदार गतीमुळे हे वादळ सुरु झाले आणि चंदीगढ, मोहाली आणि पंचकुलामध्ये ते पोहोचले.

नवी दिल्ली : उत्तर भारतात प्रचंड उष्ण तापमान असतानाही उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी, बळकोटे, पौरी आणि तिहरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. स्थानिक रहिवाशांच्या मदतीसाठी इंडो-तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाच्या पाच तुकड्या उत्तराखंडच्या विविध भागात पाठविण्यात आल्या आहेत. 

dust storm

दरम्यान, सायंकाळच्या वेळेतील ही ढगफुटी दिल्ली-एनसीआर, चंदीगढ आणि आजूबाजूच्या परिसरात झाली. पावसाच्या जोरदार गतीमुळे हे वादळ सुरु झाले आणि चंदीगढ, मोहाली आणि पंचकुलामध्ये ते पोहोचले. देहराडूनमध्येही हा मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. उर्वरित देश मान्सूनच्या प्रतिक्षेत असताना उत्तर भारतात बहुतेक प्रदेशात उन्हाचा जोरदार तडाखा सुरु होता. 

दिल्लीमध्ये, तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर होता, जो हवामानाच्या अंदाजानुसार एका नॉचने अधिक होता आणि किमान नोंद 30 अंश सेल्सियस होती, जी हवामानाच्या सरासरीपेक्षा तीन टक्क्यांनी अधिक होती. हवामान खात्यानुसार, देशात आर्द्रतेची टक्केवारी ही साधारण 39 टक्के ते 72 टक्के होती. राजस्थानातील चुरु येथे 49.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, सामान्य तापमानाच्या नोंदीत 8 अंश सेल्सिअसने अधिक आहे. तर श्रीगंगानगरमध्ये कमाल तापमान 49.1 डिग्री सेल्सियस नोंदविले गेले आहे, जे सामान्य तापमानाच्या नोंदीत 7 अंश सेल्सिअसने अधिक आहे. 

हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत वादळाने धुमाकुळ घातला. त्यात अनेक ठिकाणची झाडे पडली, तसेच शिमला आणि आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. जोरदार वारा आणि पावसामुळे दिवसभरातील तापमान काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे चंबा, कांगरा, शिमला आणि इतर भागातही उष्णता कमी होण्यास मदत झाली. 

बाजीनाथ येथे सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस पडला. त्यापाठोपाठ पांडोह येथे 31 मिमी, तर गोहरला 30 मि.मी. आणि मंडी येथे 24 मिमी इतका पाऊस झाला.
राज्यातील उना येथे कमाल तापमान 40 डिग्री होते. त्यापाठोपाठ नयन, भूर्त आणि सुरेननगर येथे अनुक्रमे 35.5 अंश सेल्सियस, 35.2 अंश सेल्सियस आणि 35.9 अंश सेल्सिअस तापमान होते. फतेहगडच्या नोंदनीनुसार राज्यात सर्वात जास्त तापमान 44.3 डिग्री सेल्सियस होते. नारनौळच्या नोंदनीनुसार, पंजाब आणि हरियाणा येथे सर्वाधिक 46.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असुन सामान्य तापमानाच्या तुलनेत ती 5 डिग्रीने अधिक आहे. 

दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी असलेल्या चंदीगढमध्ये कमाल तापमान 38.3 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली. हिस्सारच्या नोंदणीनुसार, हरियाणा व इतर ठिकाणी कमाल तापमान 46 अंश सेल्सियस नोंदविले गेले, ते सामान्य तापमानापेक्षा चार डिग्रीने अधिक होते आणि भिवानी येथे 45.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाबच्या नोंदनीनुसारमध्ये अमृतसर आणि लुधियानामध्ये अनुक्रमे 42.3 आणि 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

Web Title: Cloudburst in Uttarakhand dust storm hits Delhi and Chandigarh