चहावाल्याच्या नादी लागू नका : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला उज्ज्वल भवितव्य आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक जण एकत्र येत आहेत. पण त्यांनी चहावाल्याच्या नादी लागू नये. तुम्ही त्यांच्याविरोधात औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना भरला. राज्यात परिवर्तन व्हायला सुरवात झाली आहे. हे राज्य म्हणजे हे शिवसाम्राज्य आहे, असेही ते म्हणाले. 

भारतीय जनता पक्षाच्या महामेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला उज्ज्वल भवितव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या हल्लबोल यात्रेचा उल्लेख करून ते म्हणाले, ही डल्लामार यात्रा आहे. यांनी राज्याची कोट्यवधींची लूट केली. आता आमच्या सरकारवर टीका करत आहेत. लोक यांना पुरेपुर ओळखून आहेत. लोक यांना फसणार नाहीत.  

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या आधीच्या सर्व अध्यक्षांचा आवर्जून उल्लेख केला. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा उल्लेख केला, तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. आपल्या पक्षाचे नसले तरी ज्यांनी हिंदुत्ववाद देशात जागविला त्या बाळासाहेबांचे योगदान लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: CM Devendra Fadnavis Reacted on opposition allegations