सत्तेच्या समीकरणाबाबत मी बोलणार नाही : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नवं सरकार राज्यात लवकरच स्थापन होईल. सत्तेच्या समीकरणांबाबत मी आणि भाजपचे नेते काहीच बोलणार नाही. ओल्या दुष्काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून अमित शहांची भेट घेतली. तात्काळ मदत मिळण्यासाठी त्यांनी निर्देश दिले आहेत. 

नवी दिल्ली : सत्तेच्या समीकरणांसंदर्भात कोण काय बोलते यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता असून, आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पवार-सोनियांच्या भेटीतून नवी राजकीय समीकरणे : तटकरे

राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. राज्यातील ओल्या दुष्काळासंदर्भात ही भेट होती. मुख्यमंत्र्यांनी बोलताना युतीचा उल्लेख टाळल्याचे स्पष्ट दिसले.

लक्ष्य तक पहुंचने में मजा आता है! : संजय राऊत

मुख्यमंत्री म्हणाले, की नवं सरकार राज्यात लवकरच स्थापन होईल. सत्तेच्या समीकरणांबाबत मी आणि भाजपचे नेते काहीच बोलणार नाही. ओल्या दुष्काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून अमित शहांची भेट घेतली. तात्काळ मदत मिळण्यासाठी त्यांनी निर्देश दिले आहेत. 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी म्हणून ते स्वतः लक्ष घालणार आहेत. विम्या कंपन्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. नुकसानीचा अहवाल मी त्यांच्याकडे सुपूर्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis talked about government formation in Maharashtra