Arvind Kejriwal : सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ केजरीवालांची ध्यानधारणा; 'आप'ची मोदींवर टीका | cm kejriwal sitting praying for the country will meditate from 10 am to 5 pm | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ केजरीवालांची ध्यानधारणा; 'आप'ची मोदींवर टीका

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज देशासाठी प्रार्थना करत आहेत. देशाच्या भल्यासाठी दिवसभरााची पूजा सुरू करण्यापूर्वी केजरीवाल राजघाटावर पोहोचले होते, जिथे त्यांनी महात्मा गांधीयांना आदरांजली वाहिली. केजरीवाल म्हणाले की, शाळा रुग्णालये बांधणाऱ्यांना पंतप्रधान तुरुंगात पाठवत आहेत. कोट्यवधींची लूट करणाऱ्यांना पंतप्रधान मोदीजी आलिंगन देत आहेत. मला देशातील परिस्थितीची चिंता आहे.

मंगळवारी केजरीवाल यांनी होळीच्या निमित्ताने देशासाठी प्रार्थना करणार असल्याचे म्हटले होते. जे चांगले काम करत आहेत त्यांना अटक केली जात आहे, तर देशाला लुटणारे पळून जात आहेत, असा दावा त्यांनी केला. व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी देशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. केजरीवाल यांनी ध्यान धारणा करून केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध नोंदवला.

दिल्लीचे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र ६५ वर्षे दुर्लक्षित असून मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी गरिबांचे चांगले आरोग्य आणि शिक्षण मिळावे यासाठी कठोर परिश्रम घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैन आणि सिसोदिया यांनी देशासाठी केलेल्या चांगल्या कामासाठी त्यांना तुरुंगात डांबले आहे, तर देशाला लुटणाऱ्यांना मिठी मारली जात आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता.