esakal | ममता बॅनर्जींनी भरला निवडणूक अर्ज; पुन्हा भाजप विरोधात मैदानात
sakal

बोलून बातमी शोधा

CM Mamata Banerjee

ममता बॅनर्जींनी भरला निवडणूक अर्ज; पुन्हा भाजप विरोधात मैदानात

sakal_logo
By
सुधीर काकडे

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी आज भवानीपुर पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. येत्या ३० ऑगस्टला या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. भारतीय जनता पक्षाने या मतदार संघात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रियंका टिबरेवाल यांना मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या ठिकाणी आपला उमेदवार देणार नाही. एप्रील २०२१ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांना पराभव स्विकारावा लागला होता.

पश्चिम बंगालच्या भवानीपुर, समशेरगंज आणि जंगीपुर मतदारसंघात ३० सप्टेंबरला पोटनिवडणुक पार पडणार आहे. त्याचबरोबर ओडिशामधील पिपली मतदारसंघात देखील पोटनिवडणुक पार पडणार आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. भाजपने या निवडणुकीत प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्याविरोधत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने सुरुवातीला भवानीपुर मतदार संघात आपला उमेदवार देणार असल्याचे सांगितले होते. मात्र नंतर काँग्रेसने उमेदवार न देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा: बाहुबलींना स्थान नाही; मुख्तार अन्सारींना दणका देत मायावतींचा मोठा निर्णय

दरम्यान, या वर्षी एप्रीलमध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भाजपने जोरदार लढत दिली होती. भाजपचे दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात 294 जागांसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांची आवश्यकता होती. तृणमूलने राज्यात स्पष्ट बहुमत मिळवलंय. मात्र, ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.

loading image
go to top